ओळख पहिली गाली हसते,Olakha Pahili Gali Hasate

ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते

आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनी ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते

नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते

करी बांगडी राजवारखी
नथणी बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्‍नपारखी
म्हणूनी तुजला घडी घडी पुसते

No comments:

Post a Comment