ओळखले मी ओळखले
तुझ्या दिलवरा मनातले
तव नयनांची या नयनांनी
धरली हळवी प्रीत शिकवणी
नजरेच्या त्या मुळाक्षरांनी
कशि लाजाया नकळत शिकले
हेच नेमके असेल पुसले
शिकता शिकता डोळे खिळले
हात रेशमी गळ्यात रूळले
ओठवरती गीतही जुळले
शब्दाविण ते नव्हते कळले
तेच नेमके असेल लिहिले
No comments:
Post a Comment