ओवाळिते मी लाडक्या भाऊराया
चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया
दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली
कळस होऊनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया
डोळे दोन ज्योती तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
आतूरली पूजेला माझी काया
गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया
No comments:
Post a Comment