मी तर जाते जत्रंला
गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला
कुणी तरी बोलवा दाजिबाला
दाजिबा सारखा दिर दुनियेमध्ये नाही
गोऱ्या भावजयीची त्यांना लई अपुर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंदट आमच्या नशिबाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला
दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढं घेतील हसून चटदिशी
निघता निघता उशीर झाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला
दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्या-बसल्या
अंगाला अंग लागतं, अन् होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या
मी लई भुलते रुबाबाला,
कुणी तरी बोलवा दजिबाला
साज शिणगार केला, ल्याले साखळ्या तोडे
ऐन्याची घातली चोळी अन् जरीचे लुगडे
अशा मध्ये असावे संगे दाजिबा तगडे
म्होरं मग ठाउक जोतिबाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला
No comments:
Post a Comment