किती वयाचे धराल भय,Kiti Vayache Dharal Bhay

किती वयाचे धराल भय हे प्रौढपणा सोडा
मी बाल्याच्या वनी नाचते शिव-धनू करुनी घोडा

सुवर्णचाफ्यावरती चढुनी, सपर्ण सुमने आणा खुडुनी
सुखे सख्यांनो माझ्यावरती बाण फुलांचे सोडा

दूर दूर त्या निळ्यात राही, कमल डुलतसे शामल रंगी
ओझे उचलून कुणी तरी ते माझ्यासाठी काढा

वनी कोण हे कुमार दोघे, काय अचानक मनात जागे
शामवर्ण तो वीर पाहता जीव जाहला वेडा

No comments:

Post a Comment