किती दिसांनी आज भेटसी,Kiti Disani Aaj Bhetasi

किती दिसांनी आज भेटसी, पुसशी कुशल मला
तुझ्याचसाठी झुरते मनि मी, कशी सांगू रे तुला

प्रीतीची वचने राजा, विसरू कशी?

दिवस सहज निघुनी जातो, रात्री आठव येतो
अश्रुंनी माझी भिजुनि जाई उशी


मानभावी पुरूषी वाणी, फुलपाखरांची गाणी
स्त्री-जाति वेडी भुलुनि पडते फशी

एकवार मधुकर येतो, चैत्रमास चाखुन जातो
स्वप्नाळू राही, फुलवेली वेडीपिशी

No comments:

Post a Comment