खरा ब्राम्हण नाथची झाला
जो महारा घरी जेवला
गोदावरीचे करुनी स्नान
पवित्र पावन नाथ देखुन
दुष्ट थुंकितो अंगावरती
क्रोध जाळितो शंभरवेळा
पददलिताचे मूल तान्हुले
रडता स्फुंदुन कडे घेतले
मुके पटापट घेता त्याचे
हसवी खुदुखुदु बालप्रभूला
मुके जनावर व्याकुळलेले
मार्गी पाहुन नाथ धावले
गंगाजळ ते मुखी घालता
पाषाणाला पाझर फुटला
घरात आमच्या पुरणपोळी
तुमच्यासाठी नाथा केली
महाराची ती पोर बोलता
बोट धरुनी संत चालला
धूप घालता सुवास सुटला
मागे पुढती पाट मांडिला
नाथांने मुखी घास घातला
पुंडलिक वरदा हरी बोला
No comments:
Post a Comment