खराच कधी तू येशिल,Kharach Kadhi Tu Yeshil

अर्ध्या रात्री झोप मोडिशी
खराच कधी तू येशिल का ?
ओळख करुनी घेशिल का ?

खिडकीपाशी उभा राहुनी
हसशील का हळू मला पाहुनी
सर्वांगाने पीत चांदणे,
प्रीत गीत तू गाशिल का ?
मी मग होऊन वेड्यावाणी
भारावुन मी येता पुढती,
हातच हाती घेशिल का ?

हसेल नभीचा चंद्र दहादा
दटावणी हा दाविल पडदा
विचारीन मी काही बाही,
होकार हसरा देशील का ?

No comments:

Post a Comment