कामापुरता मामा,Kamapurata Mama

कामापुरता मामा, ताकापुरती आजी
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्‍नी असते राजी

मित्र म्हणोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना
तुटून पडते नाण्यावरती सारी वानरसेना
तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी
पैशावाचून वैद्य बघेना पिडलेल्यांची नाडी

लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला
पैशावाचून फुटेना अंकूर प्रेमाच्या बीजाला
नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची
काका, मामा, बंधू, भगिनी, सगळी हो स्वार्थाची

पैसा असता मान, मरातब; सलाम करती सारे
अधनावस्था पाहून म्हणतील दूर निघोनी जारे
हात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला
गरिबासाठी येथे काठी, त्याला कुणीही टोला

No comments:

Post a Comment