कधी तू हसावे कधी,Kadhi Tu Hasave

कधी तू हसावे, कधी तू रुसावे,
नको ग, नको ग, नको साजणी !

सखी प्रीत माझी तुला वाहिली

तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली
नको हा बहाणा, असा दूर जा ना
नको ग, नको ग, नको साजणी !

कळी लाजरी ही फुलेना कशी,
तिला भावना ही कळेना कशी,
मुखी गोड भाषा, अशी ही निराशा,
नको ग, नको ग, नको साजणी !

प्रिये राहसी तू मनी मानसी,
जगावेगळी तू अशी प्रेयसी,
मलाही कळावे, तुलाही जुळावे,
नको ग, नको ग, नको साजणी !

No comments:

Post a Comment