कधी रे पाहिन डोळा तुला,Kadhi Re Pahin Dola Tula

कधी रे पाहिन डोळा तुला ?
सोनुल्या देवाघरच्या फुला

कस्तुरी-हरिणाच्या उदरी,
हरीने साठविली कस्तुर
सुगंधे हरिणच वेडावला !

देव तू येशिल माझ्या घरी
तुझ्यास्तव अमृत माझ्या उरी

कधी ते भरविन बाळा तुला ?

फुला, तू संसारी मंगल
फुला, तू फुलाहूनी कोमल
करिन या तळहाताचा झुला !

No comments:

Post a Comment