कधी शिवराय यायचे तरी
दिवाळि दसरा मिळुनि सोहळा आता व्हायचा घरी
सडा केशरी शिंपिन दारी
रांगोळी घालीन किनारी
गरिबाचे घर जाइल उजळुन राजमंदिरापरी
छत्रपतींच्या सरदराशी
मराठमोळ्या दिलदाराशी
ठरले माझे लगीन, पडतिल तांदूळ डोईवरी
मिळता आशिर्वाद तयांचा
साक्षात्कारच चैतन्याचा
मीच नव्हे उठतात शिरा या अमृत प्यालापरी
No comments:
Post a Comment