कधिं करिती लग्न माझें तुज ठावें ईश्वरा ॥
वाढली उंच ही किती । हंसुनि बोलती ।
नाक मुरडिती । स्त्रिया परभारां ॥
मैत्रिणी वदति टोंचुनी । शब्द ते मनीं ।
जाति भेदुनी । सुरीच्या धारा ॥
जनक तो नांव काढिना । माय सुचविना ।
हौस मग कुणा । कोण झटणारा ॥
No comments:
Post a Comment