कधी अचानक सांग सखे,Kadhi Achanak Sang

कधी अचानक सांग सखे तू स्वप्नी माझ्या येशील का ?
इंद्रधनूचे सार रंगही नभात उधळून देशील का ?


श्रावणमासी सरसर धारा, टपटप गारा होशील का ?
उधाण वारा, मोरपिसारा, फुलवून कळी तू येशील का ?

कधी किनारी रूपकेशरी लाजलाजरी होशील का ?
अवतीभवती मिटले डोळे सांग बावरी होशील का ?

कधी न पाहिली तुला परंतु भास तुझे होती मज का ?
सतत तुझी ही चाहूल मजला येत राहते पुन्हा पुन्हा का ?

No comments:

Post a Comment