काय पुरुष चळले बाई,Kaay Purush Chalale Bai

काय पुरुष चळले बाई । ताळ मुळीं उरला नाहीं ।
धर्म-नीति शास्त्रें पायीं । तुडविती कसे हो ॥

साठ अधिक वर्षें भरलीं । नातवास पोरें झाली ।
तरिहि नव्या स्त्रीची मेली । हौस कशि असे हो ॥


घोडथेरड्यांना ऐशा । देति बाप पोरी कैशा ।
कांहि दुजी त्यांच्या नाशा । युक्ति कां नसे हो ॥


शास्त्रकुशल मोठे मोठे । धर्म-गुरुहि गेले कोठे ।
काय कर्म असलें खोटें । त्यांस नच दिसे हो ॥

No comments:

Post a Comment