काय बाई सांगू,Kaay Baai Sangu

काय बाई सांगू ? कसं ग सांगू ?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज !

उगीच फुलुनी आलं फूल
उगिच जीवाला पडली भूल
त्या रंगाचा, त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी लाजरी, झाले धीट
बघत राहिले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरुन गेले रीत-रिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

सहज बोलले हसले मी
मलाच हरवुन बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाहि चालला काही इलाज
काही तरी होऊन गेलंय आज !

No comments:

Post a Comment