बरसात चांदण्याची, वारा कसा हलेना
का मोगरा फुलेना ?
डोळ्यांतल्या जळाने मी रूप थोर केले
वाढीस लागला हा आले वसंत, गेले
हिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना ?
का मोगरा फुलेना ?
माझ्या मनोव्यथांची हळुवार भावगीते
भवती फिरून याच्या मी नित्य गात होते
हिमशुभ्र हास्य तैसे याच्यावरी डुलेना
का मोगरा फुलेना ?
लागे ना थांग याचा अजुनी न मौन सोडी
आधिच धुंद झाले मी मात्र गंधवेडी
चुकते कुठे कुणाचे माझे मला केळेना
का मोगरा फुलेना ?
No comments:
Post a Comment