का चिंता करसी, प्राण्या, का चिंता करसी
नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करसी
दो पायावर रचतो सुंदर, देहाचे जो मंगल देऊळ
तोच चालवी आपुले पाऊल, का मागे बघसी
घर हे सुटता नाते तुटता, जग ही झाले जरी पारखे
सुखदु:खही रे तुला सारखे, का डोळे पुससी
चंद्र हासरा गोड मुखाचा, रसाळ वाणी अमृताची
प्रेमळ दृष्टी तुझ्या मनाची, देव तुझ्यापाशी
No comments:
Post a Comment