कळ्यांचे दिवस फुलांच्या,Kalyanche Diivas

कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
येती नि जाती

नवल असे घडते बाई
स्वप्नात स्वप्न पडते बाई
सख्याचा स्पर्ष, अनोखा हर्ष
प्रीतिच्या सारिका मंजूळ मंजूळ गाती

वाऱ्याची झुळुक, झुलता झुला
क्षणात उंच नेत असे मला
सांजेचे रंग धुंद तरंग
पाचही प्राण सुखात सुखात न्हाती