गोकुळ सोडुन गेला माधव,Gokul Sodun Gela Madhav

गोकुळ सोडुन गेला माधव, उभा वाहतो वारा
उदास झाले गोकुळवासी, धेनू न शिवती चारा

कुंजवनीच्या कळ्या जळाल्या, फुलल्यावाचुन देठी
करपुन गेली बीज-बियाणे, भूमातेच्या पोटी
शुकापिकांच्या कंठी झाले, सूर थिजुनिया गारा

वार्धक्याची खचली कंबर, तरुणपणा हो वेडा
उंबरठ्याच्या आतच खचला, बाळपणाचा गाडा
लावण्याची झडे नव्हाळी, गाव गहिवरे सारा

No comments:

Post a Comment