अवघा तो शकुन,Avagha to Shakun

अवघा तो शकुन ।
हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥

येथें नसतां वियोग ।
लाभा उणें काय मग ॥२॥


संग हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥

तुका म्हणे हरिच्या दासां ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥

1 comment:

  1. प्रत्येक गोष्टी मुहुर्तावर करणारा आपला हिंदू धर्म भारत व नेपाळच्या बाहेर जाऊ शकला नाही. ज्यांना पंचाग व मुहुर्ताचे काही देणेघेणे नाही तो ख्रिश्चन व मुस्लीम धर्म जग व्यापतोय याला काय म्हणायचे ?
    म्हणूनच जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे मोल अनमोल आहे.

    ReplyDelete