अल्लड माझी प्रीत,Allad Majhi Preet

अल्लड माझी प्रीत, तिला ना रीत जगाची ठावे
आवडेल तो मित्र करावा त्याच्यासंगे गावे

अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा
एक सौंगडी संगे यावा छेडित छेडित तारा
सूर पहाडी, बोल रांगडे मुखात माझ्या यावे


तरू शिरावरी एक असावा फुले पडावी माथी
एक सावळा हात असावा लोभसवाण्या हाती
चहू दिशांनी फुले फुलावी धुंद सुगंधे व्हावे

दबकत दबकत निळ्या नभावर चांद वाकडा यावा
मुशाफिरासह बोलत जावे अनोळखीच्या गावा
वाट सोडुनी भटकत भटकत रानी गहन शिरावे

No comments:

Post a Comment