"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीहि सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !
शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित जाहली हरिणीसम ती रती !
वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रूप अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभू माता मानिती !
अलंकार ते वस्त्रभूषणे - देउन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतुन शब्द अजुन येती !
Khup chaan 👌🏻 Maharaj pratekacha hridayaat aahet, maharaja chi shikwan pan pratek vyakti madhe rujali ch pahije.
ReplyDeleteअतिशय सुंदर गीत आहे हे. फार पूर्वी मी हे गीत ऐकलं होतं. आज अपवादात्मक अशा अवस्थेत ते परत ऐकलं व मनाला फार फार भावलं. सांगलीकर
ReplyDelete