अशी धरा असे गगन,Ashi Dhara Ase Gagan

अशी निशा पुन्हा कधी दिसेल का ?
अशी धरा असे गगन सजेल का ?

सुरम्य चंद्रबिंब तारकावली
निशा चढे निशेस चोर पावली
ढगात चंद्र मग जरा लपेल का ?

सुगंध रातराणीचा तरंगतो
प्रशांत धुंद आसमंत पेंगतो
दवांत मग धरा जरा भिजेल का ?

विशाल तो कदंब झेली चांदणे
मिठीत भान हरपुनी सुखावणे

अशीच उर्मी अन्‌ कधी मिळेल का ?

No comments:

Post a Comment