अशा या चांदराती,Asha Ya Chandrati

कुणा सांगू तुझ्याविण ही मनातील लाजरी प्रीती
अशा या चांदराती, दे मला सजणा तुझी प्रीती

उभी येथे तुझ्यासाठी, कधीची पाहते वाट
दिसे या धुंद एकांती नदीचा भोवती काठ
असे हृदयांत या माझ्या तुझी कृष्णापरी मूर्ती
अशा या चांदराती

नदीकाठी पहा येथे तरुंच्या झोपल्या छाया
निजे वारा, निजे तारा, निशेची दाटली माया
तुझ्या श्वासांत भेटू दे प्रिया नि:श्वास हा अंती
अशा या चांदराती

जगाला हे कसे ठावे ? दिसावे प्रेम डोळ्यांना
मुकी प्रीती असे जगती, कशी समजेल शब्दांना
नभी पाहून चंद्राला जशी सिंधूस ये भरती
अशा या चांदराती

No comments:

Post a Comment