अरे देवा, तुझी मुले, अशी का रे भांडतात ?
कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात
जातपात पाहुनीया, सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला, का रे जन्मासवे येतो ?
कुणी लोळे वैभवात, कुणी लोळतो चिंतेत
नाथाघरचे भोजन, सारा गाव पंगतीला
दुधभात सर्वांमुखी, आग्रहाने भरवीला
थोर संतांच्या या कथा आम्हा सा-यांच्या मुखात
जरी पंढरीचा राव, विठू महार जाहला
गावाबाहेर टाकले, आम्ही आमुच्या भावाला
भूतदयेचे अभंग रंगवीतो देऊळात
आता वागण्याची तऱ्हा, जरा निराळी करावी
अभंगांची एक तरी, ओवी अनुभवा यावी
वर्णभेद ज्याच्या मनी, तोची मलीन पतित
No comments:
Post a Comment