आई होऊन चुकले का मी, Aai Houn Chukale Ka Mi

आई होऊन चुकले का मी

पोर पोटची देत न ओळख, आईपणाला मुकले का मी ?नऊ मासाचा पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला

पदराआडून अमृत पान्हा या मायेने जीला पाजिला


तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मीपति विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी

आई म्हण तू या आईला; सांगायाची झाली चोरी

अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का

No comments:

Post a Comment