Showing posts with label S-श्रेया घोषाल. Show all posts
Showing posts with label S-श्रेया घोषाल. Show all posts

सूर आले शब्द ल्याले,Sur Aale Shabd Lyale

सूर आले, शब्द ल्याले
माझ्या आर्जवी मानात मैत्र लाघवी जागले

आतुरले, वेडावले
माझ्या ओंजळीत कुणी फूल बकुळी शिंपले
वारा हाले, रान डोले
अनामिक चाहूल ये आनंदात मन न्हाले

गंधावले, धुंद झाले
माझ्या वेल्हाळ बोलाने घर रुणझुण झाले
घर सारे मुग्ध झाले
भिंत भिंत सुखावून तृप्त सौख्य नांदले

मन रानात गेलं ग,Man Ranat Gela Ga

मन रानात गेलं ग, पानापानात गेलं ग,
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या ताऱ्याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग !

सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वाऱ्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग !

जीव दंगला गुंगला,Jeev Dangala Gungala

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल,
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढिंचा इटाळ,
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू

खुळं काळिज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखीन माझ्या जल्माचं गोंदण

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू

जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू

सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू