Showing posts with label S-शैला चिखले. Show all posts
Showing posts with label S-शैला चिखले. Show all posts

डोल डोलतंय्‌ वाऱ्यावर बाय Dol Dolatay Varyavar Bay

डोल डोलतंय्‌ वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतंय्‌ वाऱ्यावर



खंडोबा राया परतंय्‌ मी पाया

तुझे भेटीला हाणीन नौकेला



डोंगरची माऊली कोल्यांची सावली

दर्यान्‌ कोल्यांचे हाकेला धावली




होरं कसं जाऊ दे बारान्‌ गावीला

माव्हरं सोनेरी पडेल आपले डोलीला



माव्हरं कसं परलंय्‌ आपले डोलीला

शिंगाला सरगा काटेरी पाला



पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌ गो

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌