Showing posts with label S-ऋषिकेश कामेरकर. Show all posts
Showing posts with label S-ऋषिकेश कामेरकर. Show all posts

सांज वेळी सांज रंगी SANJ VELI SAJ RANGI

)

सांज वेळी सांज रंगी,रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सांज वेळी सांज रंगी,रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सा ना ना साना सुर हे नवे 
फुलुण मन गाये त्या सवे 
ओठावरी सरगम

भीर भीर या अंबरी
नभाच्या उरी वाटते उंच उंच विहरावे
रंग निळे जांभळे
ऊन कोवळे
घेऊनी पंखावर मिरवावे
वार्यातले सुर फुलवीत यावी ओठांवरी  
यावी ओठांवरी , यावी ओठांवरी   सरगम

गहिवर या क्षणी वाटते मनी 
रेशमी स्वप्न नवे उमलावे 
नकळत यावे कुणी 
हरपुनी भान असे बरसावे 
गहिवर या क्षणी वाटते मनी 
रेशमी स्वप्न नवे उमलावे 
नकळत यावे कुणी 
हरपुनी भान असे बरसावे 
मनातले अर्थ फुलविता 
यावे ओठांवरी,यावे ओठांवरी
सरगम

सांज वेळी सांज रंगी,रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सांज वेळी सांज रंगी,रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सा ना ना साना सुर हे नवे 
फुलुण मन गाये त्या सवे 
ओठावरी सरगम

Music -ऋषिकेश कामेरकर  RSHIKESH KAMERAKAR
Singer -ऋषिकेश कामेरकर ,शिल्पा पै RSHIKESH KAMERAKAR,SHILPA PAI
Movie / Natak / Album -क्षणभर विश्रांती KSHANABHAR VISHRANTI

प्रेम रंगात रंगुनी Prem Rangat Ranguni





प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झणकारते मनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे
धुंद गंधात न्हाउनी, गीत ये आकारुनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
जीव आसावला, कंपने हि नवी
ऐकू येते उरी, स्पंदने हि नवी
स्वप्न डोळ्यात देखुनी, साज छेडीत ये कुणी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा





Lyrics -गुरु ठाकूर Guru Thakur
Music -ऋषिकेश कामेरकर Rishikesh kamerkae
Singer -ऋषिकेश कामेरकर Rishikesh kamerkae
Movie / Natak / Album - क्षणभर विश्रांती Kshanbhar Vishranti