Showing posts with label M-शाहीर अमर शेख. Show all posts
Showing posts with label M-शाहीर अमर शेख. Show all posts

सुटला वादळी वारा,Sutala Vadali Vara

हुशियार.....

सुटला वादळी वारा !
वल्हव जोमात जरा, गाठू किनारा,
गड्या गाठू किनारा, गड्या गाठू किनारा रे

उजविला म्हागाई, बेकारीचं कडं... बसंल धडक
ह्येरून ठेव पर माराया धडक ... फोडाया खडक
एकीचा दीप कुठं दिसतोय का हुडक ... वल्हव तडक
तिकडं बी पाऊस गारा... जनु मशीनगनचाचं मारा
गाठू किनारा, गड्या गाठू किनारा
गड्या गाठू किनारा, गड्या गाठू किनारा रे

वादळी वाऱ्याची भिती कुणाला... आम्हा कोळ्यांला ?
छातीवर नाचाया जल्माला आला... भितंय्‌ का त्याला ?
डोंगर लाटेचा समुरनं आला... रोखून त्याला
एकीचा करून पुकारा... वल्हं डावीला नेटानं मारा
झुंजु गाठू किनारा, गड्या गाठू किनारा
गड्या गाठू किनारा, गड्या गाठू किनारा रे

किनारा गाठू तर खाईल ना पोरं ... धिरानं घ्या रं
दर्यात हिमतीनं डोली टाका रं ... म्हावरं धरा रं
अरं म्हावऱ्यासाठी नाव लोटलीया नार... काळाच्या म्होरं
पोटासाठी नाव लोटलिया नार... काळाच्या म्होरं
काळावरी वार करा .. अन्‌ भरभर म्हावरं बी धरा
झुंजु गाठू किनारा, गड्या गाठू किनारा
गड्या गाठू किनारा, गड्या गाठू किनारा रे
सुटला वादळी वारा !