Showing posts with label M - यशवंत देव. Show all posts
Showing posts with label M - यशवंत देव. Show all posts

अपुल्या हाती नसते काही Apulya Hati Nasate Kahi

अपुल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे

कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे

भिरभिरणा-या फूलपाखरा नसेन आशा
विसावले जर, ओंजळीचे तर फूल करावे

नको याचना जीव जडवुनी बरसातीची
मेघच जाहले अनावर, भिजून घ्यावे

नकोच मनधरणी अर्थाची नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे


L - मंगेश पाडगावकर,
M - यशवंत देव,
S - अरुण दाते

अर्धीच रात्र वेडी Ardhich Ratra Vedi

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


L - विं. दा. करंदीकर
M - यशवंत देव
S - पद्मजा फेणाणी-जोगळेकर

अर्धीच रात्र वेडी Ardhich Ratra Vedi

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


L - विं. दा. करंदीकर
M - यशवंत देव
S - पद्मजा फेणाणी-जोगळेकर

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती








गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते