Showing posts with label धाकटी बहीण (१९७०). Show all posts
Showing posts with label धाकटी बहीण (१९७०). Show all posts

धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना,Dhundi Kalyana Dhundi

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले, मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली

माळरानि या, प्रीतिची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की, थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की, हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा, किती हा बहाणा

चिरंजीव होई, कथा मीलनाची

तृषा वाढते, तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे, रूप या क्षणांना

धागा जुळला जीव फुलला,Dhaga Julala Jeeva Phulala

धागा जुळला, जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला

ओढ लागे तुला कोटराची
भेट दोन्ही पिला-पाखरांची
दैवलीला खरी, भाग्य आले घरी
अमृताने देह जणू न्हाला

माया ममतेची जुळतील नाती

राखी बांधीन रे आज हाती
उभी राहीन मी, वाट पाहीन मी
दृष्ट लागेल या सोहळ्याला

देवदूतापरी आज येई
रक्षणाला पुढेपाठि राही
स्वप्न साकारले, भाव झंकारले
मोल येईल या जीवनाला