धागा जुळला, जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला
ओढ लागे तुला कोटराची
भेट दोन्ही पिला-पाखरांची
दैवलीला खरी, भाग्य आले घरी
अमृताने देह जणू न्हाला
माया ममतेची जुळतील नाती
राखी बांधीन रे आज हाती
उभी राहीन मी, वाट पाहीन मी
दृष्ट लागेल या सोहळ्याला
देवदूतापरी आज येई
रक्षणाला पुढेपाठि राही
स्वप्न साकारले, भाव झंकारले
मोल येईल या जीवनाला
No comments:
Post a Comment