माझे तुझे नाते हवेसे जे मला
अनोळखी झाले रे कसे ते तुला
ते ओठावर मोहरणारे
नजरेतून सारे कळणारे
ते स्पर्शामधले सुख सारे मला पुन्हा दे ना
रोमरोमातून फुलणारे
मन आतुर आतुर करणारे
ते रेशीम रेशीम क्षण सारे मला पुन्हा दे ना
नको ना रे अबोला हा
तू एकदा मला
समजून घेशील ना
परतून येशील ना
तुझ्याविना रे जगू मी कशी ते सांग ना
समजून घेशील ना
परतून येशील ना
का फिरू सांग मागे
सांग या गुंतण्याला कोणते नाव देऊ
का फिरू सांग मागे
सांग या गुंतण्याला कोणते नाव देऊ
बैचैन जीवाला करणारे
एकाकी कणकण झुरणारेतू सांग हवेसे क्षण सारे तुला
पुन्हा ते का ?
नको ना रे अबोला हा
तू एकदा मला
समजून घेशील ना
परतून येशील ना
तुझ्याविना रे जगू मी कशी ते सांग ना
समजून घेशील ना
परतून येशील ना
Lyrics -गुरु ठाकुर GURU THAKUR
Singer -अविनाश विश्वजीत AVINASH VISHVJIT
Movie -इश्क़ वाला लव ISHQ WALA LOVE
No comments:
Post a Comment