जीव भुलला, रुणझुणला,
ओ जीव भुलला, रुणझुणला,
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला
क्षण हळवा गुणगुणला,
क्षण हळवा गुणगुणला,
बावऱ्या या क्षणा, श्वास हा गंधाळला
सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा
ना ना ना ना ना ना ना
क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणलाबावऱ्या या क्षणा, श्वास हा गंधाळला
दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
ओ दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला अन ये जरा
ना ना ना ना ना ना ना
जीव झुरला तळमळला गंधाळला
ओ क्षण हळवा, दरवळला गंधाळला
या क्षणा, श्वास हा गंधाळला
Lyrics -गुरु ठाकुर Guru Thakur
Music -अजय-अतुल Ajay Atul
Singer -श्रेया घोषाल - सोनू निगम Sonu Nigam, Shreya Ghoshal
Movie / Natak / Album -लय भारी (२०१४) LAY BHAARI
No comments:
Post a Comment