चिकमोत्याची माळ CHIKMOTYACHI MALअशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

या चिक माळेला रेशमी मौशार जोड़ा ग
या चिक माळेला रेशमी मौशार जोड़ा ग

मऊ रेशमाच्या दोऱ्यात  नवरंगी माळ ओवीली ग
रेशमाच्या  दोऱ्यात नवरंगी माळ ओवीली ग

अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

अशा चिकमाळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग
अशा चिकमाळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग

अशी तीस तोळ्याची माळ,गणपतीला घातली ग
तीस तोळ्याची माळ,गणपतीला घातली ग

अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

बाळ गणपतीला खुलुन माळ शोधली ग 
बाळ गणपतीला खुलुन माळ शोधली ग 

अशी चिक माळ पाहून गणपती किती हासला ग
चिक माळ पाहून गणपती किती हासला ग

अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

गोड हासुनी मोठा आशिर्वाद दिला ग
त्याने गोड हासुनी मोठा आशिर्वाद दिला ग

चला चला करुया नमन गणरायाला ग
त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभकार्याला ग

अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग


गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग

Music - हरेश्वर डोंगरे Hareshwar Dongare


No comments:

Post a Comment