ऐकावी वाटते AIKAVI WATATEतू अंबरात भासा परी
तू अंतरात ही श्वासा परी
मौनात स्वर तुझा रेंगाळतो
एकांत तुझा सवे झंकारतो
ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा
ऐकवी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा

चाहूल तुझी बहाराची हिरव्या ऋतुची
सर पावसाची
कधी तू धग चांदण्याची एका क्षणाची
तरीही युगांची
प्राजक्त फिरतो जसा
सहवास तुझा हा तुझा
शब्दात सांगता न ये
हा क्षण दरवळी असा

ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा

Singer -बेला शेंडे ,स्वप्निल बांदोडकर BELA SHENDE,SWAPNIL BANDODAKAR