ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार !
तूच छेड ती, तूच ऐक ती
आर्त सुरावट तुझ्याच हाती
स्पर्षावाचुन तूच छेडिसी माझी हृदय-सतार !
जागृत मी का आहे स्वप्नी ?
श्रवणि पडे पण दिसे न नयनी
स्वप्नातच का मजसि बोलले माझे राजकुमार ?
स्वप्नासम मज झाले जीवन
स्वप्नही नीरस सखी, तुझ्यावीण
अर्ध्या रात्री शोधीत आलो तुझे प्रियतमे, दार !
वेलीवर त्या नका, चढू नका
चढा सूर नच लवे गायका !
तूच चढविला तारस्वर हा तूच तोड ही तार !
Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -पु. ल. देशपांडे P.L.DESHPANDE
Singer -आशा भोसले , पं. वसंतराव देशपांडे PANDIT VASANTRAW DESHAPANDE
Movie / Natak / Album -गुळाचा गणपती GULACHA GANAPATI

No comments:
Post a Comment