एकटी शिवारी EKATI SHIWARI

एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा

दाटली ग सांज बाई दिवस बुडाया आला
अंतरी कशाचा उजेड माझ्या झाला
का असा अचानक हा डोले ग जोंधळा

तुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी
धुंडीत तुला ती मळ्यात फिरे स्वारी
तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा

लपंडाव का असा, तोंड तरी पाहू दे
ना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे
होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा


Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADALULAKAR
Music -वसंत पवार  VASANT PAWAR
Singer -आशा भोसले , बालकराम BALAKRAM
Movie / Natak / Album -तू सुखी रहा TU SUKHI RAHA

No comments:

Post a Comment