रमा माधवांचे rama RAMA MADHAVACHE

रमा माधवांचे जिथे चित्त लागे

जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे

तया थेऊरला चला जाऊ या

गणेशाप्रती आरती गाऊ याजिथे मोरया मूर्ती पद्मासनात

दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत

असा भक्त चिंतामणी पाहू याबघे देव प्राचीवरी सुर्यबिम्बा

तया पाहते कौतुके माय अंबा

पदी पद्म त्याच्या चला वाहू या


Music -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment