नकळत विणले जाते जाळे NAKALAT VINALE JATE JALEनकळत विणले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन
नकळत विनले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते 
कुणीतरी खुलते दूरवर,दरवळते इथे मन

मौनातुनी झरते जसे चांदणे,शब्दातले जाते कुठे बोलणे 
मौनातुनी झरते जसे चांदणे,शब्दातले जाते कुठे बोलणे 
कोण छेड़ते अबोल तारा अबोल जैसे आहे मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन

केव्हातरी येतात लहरी अशा, रेंगाळती वाळूत लाटा जशा
क्षणभर दिसतो एक किनारा,क्षणभर वेडे जळते मन 
जिवलग होते कुणीतरी अनं स्वतास परके होते मन
हे नाते कोणते हे धागे कोणते 
कुणीतरी खुलते दूरवर,दरवळते इथे मन
नकळत विनले जाते जाळे ,नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतास परके होते मन 

Singer -अवधूत गुप्ते,निहिरा देशपांडे AVADHUT GUPTE,NIHIRA DESHAPANDE
Movie / Natak / Album -संशयकल्लोळ  SANASHAYKALLOL

No comments:

Post a Comment