कधी ना कधी kadhi na kadhi

कधी ना कधी ,कधी ना कधी.....  ,कधी ना कधी.…
मी दूर दूर जाताना ,इतकेच मनाशी वाटे
अनोळखी या वळणावर ,जुळून यावे नाते
या काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर
स्वप्नांच्या गावी येईल, मग आठवणींचा पुर
समजावतो मी या मना ,कधी ना कधी

वाटा या बंद सार्या ,आसवांना नसे किनारा
ये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा
मग विरून जाईल अंतर अन फुटेल सगळा बांध
कोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशमी बंध 
आठवेल सारे बघ तुला ,कधी ना कधी.…

राती सुन्या सुन्या ह्या,दिवस जाळी क्षणांक्षणांना
हाती तुझ्याच आहे,मोडलेला हा निवारा 
कुठल्याशा एका वेळी बस वळून पहा तू माघे
दिसतील तुला  तेव्हा हे वाटेवर डोळे माझे
परतून येशी तू पुन्हा, कधी ना कधी.…

Music -ऋषिकेश कामेरकर HRISHIKESH KAMERAKAR
Singer -स्वप्निल बांदोडकर  SWAPNIL BANODAKAR
Movie / Natak / Album -टाइमप्लीज  TIMEPLEASE

No comments:

Post a Comment