एकतारी गाते EKTARI GATEएकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा
मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा
ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

नाचे चोखामेळा, नाचे चोखामेळा,
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे
देव कीर्तनात नाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

अनाथांचे नाथ,अनाथांचे नाथ
नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

Singer -माणिक वर्मा MANIK VARMA
Movie / Natak / Album -BHAKTIGEET