तुझ्या पंखावरूनी या TUJHYA PANKHAWARUNI YA

तुझ्या पंखावरूनी या
मला तूं दूर नेशील  कां
तुझ्या या धुंद सुमणांचा
मला तू गंध देशील कां

धुंद हवा ,गंध नवा हवेत गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजीवा
प्रीतीच्याच स्वप्नी ,सदा असाच येशील कां

तुझ्या या धुंद सुमणांचा
मला तू गंध देशील कां

आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे -नवे लोचना
नित्य असा सांग सदा माझाच होशील कां

तुझ्या या धुंद सुमणांचा
मला तू गंध देशील कां


Lyrics -गंगाधर महाम्बरे GANGADHAR MAHAMBARE
Music -एन. दत्ता N.DATTA
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -प्रीत तुझी माझी PRIT TUJHI MAJHI

No comments:

Post a comment