डोल्यात वाकून बघतोस काय DOLYAT WAKUN BAGHATOS KAY

डोल्यात वाकून बघतोस काय
जाल्यात मसोली गावयाची नाय 

सोडून बसलास नजारांचा गल
ढवळून कडलास पाण्याचा तल
कसंबी झुक गलाचं टोक
कसंबी झुक तुझ्या गलाचं टोक
जिव्हारी माझ्या भिड़ायंच
नाय नाय नाय नाय
जाल्यात मसोली गावयाची नाय 

रुपेरी पोट माझ रुपेरी कल्ल
रुपेरी शेपटीचमारिन वल्हं  
निली निली लाट
पण्यातली वाट
निली निली लाट माझी पण्यातली वाट
माझ्या बिगर कुणा ठावीच
नाय नाय नाय नाय
जाल्यात मसोली गावयाची नाय 

सुलकन मारिन पाण्यात बुडी
देखता डोला देईन मी दडी
कुठवर बसशील चेटकु करशील
मंतर असला चलायचा
नाय नाय नाय नाय
डोल्यात वाकून बघतोस काय
जाल्यात मसोली गावयाची नाय 


Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -भास्कर चंदावरकर  BHASKAR CHANDAVARKAR
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -सर्वसाक्षी SARWASAKSHI

No comments:

Post a Comment