पाऊस असा रुनझुनता PAUS ASA RUNAJHUNATA





पाऊस असा रुनझुनता ,
पैंजनी सखीची स्मरली
पाऊस असा रुनझुनता ,
पैंजनी सखीची स्मरली

पाऊल भिजत जाताना
पाऊल भिजत जाताना
चाहुल विरत ते गेली
पाऊस असा रुनझुनता

ओले त्याने ते दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस
ओले त्याने ते दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस

ओलांडून आला गंध
ओलांडून आला गंध
निस्तब्ध मनाची रेस
पाऊस असा रुनझुनता

पाऊस सोहळा झाला
पाऊस सोहळा झाला
कोसळत्या आठवणींचा
कधी उधानता
अन केव्हा थेंबाचा संथ लईचा
पाऊस असा रुनझुनता ,
पैंजनी सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहुल विरत ते गेली

नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला

गात्रातून स्वच्छ दियंत
गात्रातून स्वच्छ दियंत
अंतरात  घुसमटलेला
पाऊस असा रुनझुनता ,
पैंजनी सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहुल विरत ते गेली 


Singer -डॉ.सलील कुलकर्णी ,संदीप खरे DR.SALIL KULAKARNI,SANDIP KHARE
Movie / Natak / Album -अलबम ALABUM

No comments:

Post a Comment