मनात मन तुझ्या MANAT MAN TUJHYA

मनात मन तुझ्या गुंतलय सार
एकांती चल तुला सांगते खरं
अगं म्होरं हो गंगुबाय 
तुझ्या मागुन मी येतो
गळ्याची आण माझ्या घेशील कां ग  
अन मागिन ते दान मला देशील कां ग
जा बाई जा गंगाराम
मला शरम येती

फिरशील कां भवतीनं
देत मायेचा गारवा
अग देईन मी गारवा
जसा घुमतो पारवा
अन बोलूया गुलुगुलु
दूर गावाच्या वेशीत  
अगं गावाच्या वेशीत
तुला घेईन मी कुशीत
घरात नीट माझ्या वागशील कां ग
सासुचे हातपाय दाबशील कां ग 
जमायचं न्हाय गंगाराम 
मी उदयाला येते

गाउ या धुंदीत
न्हाऊ चांदण्या रातीत
चांदण्या रातीत
खुप लोळुया मातीत 
खेळू या लपाछपी 
दोघं केवडयाच्या  बनात 
केवडयाच्या  बनात
बसु बिलगून पानात
बकरीला माझ्या जपशील कां रं
शेंगांच्या शेतात राबशील कां रं 
अगं म्होरं हों गंगुबाय  
तुझ्या मागुन मी येतो

होशील कां माझा तूं
सांग सनईच्या सुरात 
अगं सनईच्या सुरात
राहु बिल्लोरी घरात
थाटु या संसार बाई
तुम्ही न मी जोडीनं 
राघू मैनेच्या गोडीनं 
म्हशीची धार तूं काढशील कां ग    
पाळण्याची दोरी तू वढशील  कां ग 
आं ! चला चला गंगाराम 
मी आताच येते


Lyrics -दादा कोंडके DADA KONDAKE
Music - राम लक्ष्मण RAM LAKSHAMAN
Singer -उषा मंगेशकर ,महेंद्र कपुर  USHA MANGESHAKAR,MAHENDR KAPUR
Movie / Natak / Album -राम राम  गंगाराम  RAM RAM GANGARAM

1 comment:

  1. Dada Kondke Real Gem, Multi-talented Actor Lyricist, Director Producer who gave Number of hit songs one after another,

    ReplyDelete