पंढरी पायरी

पंढरी पायरी हाच देह व्हावा
तिथे हो विसावा घेई विठू

घन आषाढाचे मन आभाळाचे
थेंब पापण्यांचे येती दाटू 

सांज दाटलेली काळजात आता
सावल्या जिवाच्या आता मिटू

हरिनाम वाट हरिनाम ओठ
देह प्राण गाठ लागे सुट

Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET