आलो इथे कशाला AALO ETHE KASHALA

आलो इथे कशाला,माझे मला कळेना
या बेगडी जगाशी ,हा सुर ही जुळेना

झेलून घाव सारे केली अपार प्रीती
पण प्रीतीचा हिशोबी व्यवहार आकळेना

मी हाक घातली ,अन माझेच शब्द आले 
माझेच शब्द आले ,मी हाक घातली  अन
मी हाक घातली अन
माझ्या घरावरुण काळोख हा ढळेना 

मी आसवात माझ्या ही रात्र चिंब केली
पण ध्यास लागलेला ,तो चंद्र आढळेना


Lyrics -मंगेश पडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -रवी दाते RAVI DATE
Singer -अरुण दाते ARUN DATE

No comments:

Post a Comment